एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2020  | मंगळवार

  1. आज राज्यभरात दूध दरवाढीसाठी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन, गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ आणि केंद्र सरकारने दूध भुकटी आयात धोरण बदलण्याची प्रमुख मागणी https://bit.ly/39iktsZ

    2. आधी पाठिंबा जाहीर करुन मागे घेतलेल्या गोकुळ दूध संघाच्या मुंबईकडे निघालेल्या दुधाच्या टँकरमधील दूध रस्त्यावर ओतून दिलं https://bit.ly/2OGnz0H राज्यात अनेक ठिकाणी दुधाची नासाडी https://bit.ly/2E6eFYj तर काही ठिकाणी गरीबांना मोफत वाटप https://bit.ly/2CoHgrp

    3. धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळे टाळायला हवे, मुख्यमंत्र्यांना उद्देशून राष्ट्रवादीचे माजी खासदार माजीद मेमन यांचं ट्वीटhttps://bit.ly/30A4x1g मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत भूमीपूजनाला जाणार असल्याची संजय राऊत यांची माहितीhttps://bit.ly/3fZDZwU

    4. उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी नाही मग मशिदीच्या, चर्चच्या भूमीपूजनासाठी जायचं का? शिवसेना आमदार प्रताप सरनाईक याचं राष्ट्रवादीचे माजी खासदार माजीद मेनन यांना उत्तर
    https://bit.ly/2ZMMKF5

    5. ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा यशस्वी, कोणतेही साईड इफेक्ट नसलेली आणि अँटीबॉडीजप्रमाणेच टी सेल बनवण्यास लस सक्षम असल्याचा संशोधकांचा दावा https://bit.ly/2WGnC0O

    6. लोकांनी मास्क वापरले आणि गर्दीत जाण्याचं टाळलं तर कोरोनावर मात करता येईल, समूह संसर्ग झालाय की नाही, यावर भाष्य करण्यास सीएसआयआरच्या डॉ. शेखर मांडे यांचा नकार, कोरोना प्रतिबंधक लसीसाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावीच लागणार https://bit.ly/3js8jmj

    7. पिंपरी चिंचवडमधील होम क्वॉरंटाईन असलेली कोरोनाबाधित महिला पोहोचली थेट दुबईला; महापालिकेचा भोंगळ कारभार उघड https://bit.ly/39evfRj

    8.एसटी महामंडळाने गाजावाजा करत सुरू केलेल्या राज्यातील 163 महिला एसटी चालकांसह अन्य कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण थांबवलं, एसटी चालवण्याच्या अनेक महिलांच्या स्वप्नांवर विरजण https://bit.ly/2WJ5YJI

    9. गुन्हेगार, पोलीस आणि राजकीय नेते यांच्या संबंधातूनच भस्मासुरांचा जन्म होतो, या साखळीतून पोलीस बाहेर पडले तर आपोआपच साखळी तुटेल, सुपरकॉप ज्युलिओ रिबेरो यांचं पोलिसांना खुलं पत्र, न्यायपालिकेचा अधिकार न बळकावण्याचं सुपरकॉपचं आवाहन https://bit.ly/2ZKXUdm

    10. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरू झालेला नेपोटिझमचा वाद आता कंगना रणौत आणि तापसी तन्नू यांच्यातील खडाखडीपर्यंत, कंगनाच्या टोमण्यांनी तापसी भडकली, कंगना तडकली https://bit.ly/39eMJgl


 

*ब्लॉग - शेवटचा किरण… लस, पत्रकार संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष लेख* https://bit.ly/39klzob

*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक -* https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE -* https://goo.gl/enxBR