*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 फेब्रुवारी 2020 | गुरुवार*
  1. 'आम्ही 15 कोटी 100 कोटींना भारी', एमआयएम नेते वारीस पठाण यांचं चिथावणीखोर वक्तव्य, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची टीका तर वक्तव्याचा विपर्यास केल्याचं खासदार इम्तियाज जलील यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/37Jxyco
 
  1. 2014 विधानसभा निवडणुकीच्या वेळी शपथपत्रात गुन्हे लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना जामीन, न्याय मिळेल हा विश्वास असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया https://bit.ly/2SIluUy
 
  1. नीरा डाव्या कालव्यातील पाणी वाद पेटला, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर कोर्टात न्याय मागणार, तर भाजपची भूमिका आडमुठी असल्याची मंत्री जयंत पाटलांची टीका https://bit.ly/38LR4Gy
 
  1. राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच, केंद्रातील स्थान भक्कम करण्यासाठी दोन्ही पक्ष राज्यात तडजोडीसाठी तयार असल्याची माहिती https://bit.ly/2Pb1VSH
 
  1. लहान भाऊ मोठ्या भावाला भेटणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींची उद्या दिल्लीत भेट, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सविस्तर चर्चा होण्याची शक्यता https://bit.ly/2HHvdo4
 
  1. मंत्र्यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावरील अवास्तव खर्च टाळा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश, एबीपी माझाच्या बातमीची दखल https://bit.ly/32dwqww
 
  1. मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी, लष्कर-ए-तोय्यबाच्या नावाने धमकीचा मेल, पोलिसांकडून कसून तपास सुरु https://bit.ly/328WPMc
 
  1. महिला अत्याचार संदर्भातील 'दिशा' कायद्याबाबत माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आंध्र प्रदेश दौऱ्यावर https://bit.ly/32cVd42 तर हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा https://bit.ly/2HHDEj0
 
  1. आयडिया-वोडाफोनची म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक धोक्यात, गुंतवणूकदारांचं भवितव्य अंधारात, सुप्रीम कोर्टाचाही दणका https://bit.ly/32booo0
 
  1. कॅन्सरसाठी कारणीभूत आफ्रिकन मांगूर मासे 10 दिवसात संपवण्याचं राज्य सरकारचं लक्ष्य, आठवड्याभरात 50 टन मासे नष्ट  https://bit.ly/38KM1X4
  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex *Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK