सत्तास्थापनेनंतरची पहिली भेट पुण्यात
शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात निर्माण झालेल्या तिढ्यानंतर सहा डिसेंबरला उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. देशपातळीवरील पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. त्यावेळी प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर पोहोचले होते. मात्र त्यावेळी त्यांनी केवळ मोदींचं स्वागत करुन लगेच मुंबईकडे प्रस्थान केलं होतं. त्यावेळी दोघांमध्ये विशेष काही चर्चा झाली नव्हती. आता युतीमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यानंतर मोदी आणि ठाकरे यांची ही निवांत भेट असणार आहे. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा देखील होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या स्वागताला
मागील वर्षी शिवसेना भाजप युती तुटली
मागील वर्षी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची तीन दशकांची युती तुटली. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढल्या. मात्र नंतर मुख्यमंत्री पदावरून युती तुटली. यानंतरशिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. पहिल्यांदाच ठाकरे परिवारातील सदस्य मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाला.
या ठाकरे सरकारला आता जवळपास तीन महिने पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीत जात आहेत. या भेटीत ते आणखी कुणाला भेटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.