1. संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली, राम मंदिराचं भूमीपूजन केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं प्रतिपादन 


2. राम मंदिर भूमीपूजन म्हणजे 30 वर्षांच्या संघर्षाचं फळ असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत याचं मत, संकल्प पूर्ण झाल्याची भावना 


3. राममंदिर भूमीपूजनानिमित्त राज्यभरात जल्लोष, भाजपकडून शक्तीप्रदर्शन तर अनेक ठिकाणी नागरिकांकडून उत्स्फूर्त आनंदसोहळा 


4. राम प्रेम आणि करुणा आहे, तो कधीही द्वेषातून आणि क्रूरतेतून व्यक्त होत नाही, राममंदिराच्या भूमीपूजनानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया 


5. मुंबई ठाण्यासह संपूर्ण एमएमआर क्षेत्रात सकाळपासून मुसळधार, वसई-विरार, मिरा भाईंदर, पालघर परिसरालाही पावसाने झोडपलं 


6. सांगली-कोल्हापुरात गेल्या वर्षीच्या महापुराची आठवण करुन देणारा मुसळधार पाऊस; पंचगंगेची पातळी वाढली, शिराळ्यात वारणा नदीवरील पूल पाण्याखाली तर नदीकाठावरील लोकाचं स्थलांतर 


7. कोकण किनारपट्टी पावसाचं थैमान; अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर, मुंबई-गोवा हायवे बंद, गणेशोत्सवानिमित्त निघालेल्या चाकरमान्यांची दैना

8. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे देण्याला केंद्र राजी, सरकारची सर्वोच्च न्यायलयात माहिती, रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी


9. शेतात वीज कनेक्शन नसतानाही महावितरणकडून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याला एक लाखांचं बिल


10. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर याचं पुण्यात निधन, शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अनिल राठोड याचं अहमदनगरमध्ये निधन 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR