एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना आणि वाचकांना बकरी ईद मुबारक


1. राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजाराने निधन, वयाच्या 64 व्या वर्षी सिंगापूरमध्ये घेतला अखेरचा श्वास 


2. दूध दरवाढीसाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन, टँकर रोखले, दूध रस्त्यावर... काही ठिकाणी देवाला दुधाचा अभिषेक तर काही ठिकाणी गरीबांना फुकट वाटप 


3. दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत भिडले, खोत म्हणतात, 'हे काजू शेट्टी' तर शेट्टी म्हणाले, 'खोत भ्रमिष्ट झाले'


4. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी तर आमच्या सरकारने यापूर्वीच शिफारस केल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती 


5. इंदापूर येथे अपघातग्रस्ताला स्वत:ची गाडी देऊन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे दुचाकीवरुन घरी, जखमीवर वेळेत उपचार झाल्याने जीवाचा धोका टळला 


6. कोरोनामुळे जीव गमावलेल्या पोलीस, डॉक्टर आणि परिचारिकांना 'शहीद' घोषित करा, हायकोर्टात याचिका


7. कल्याणमध्ये मटका किंग जिग्नेश ठक्करची गोळ्या झाडून हत्या, कल्याणच्या एमएफसी पोलिसांकडून तपासाला वेग 


8. दहावीच्या परीक्षेत 35 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचं गावभर कौतुक.. राज्यात आतापर्यंत पाच विद्यार्थ्यांना मिळाले सर्व विषयात 35 गुण 


9. महसूल दिनाच्या निमित्ताने डिजिटल 8 अ सुविधेचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ, महत्त्वाचा 8 अ दाखला डिजिटली मिळणार 


10. सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा नवा व्हिडीओ व्हायरल, देवावर आणि न्यायदेवतेवर विश्वास असल्याचा दावा 


*BLOG* | रिपोर्ट निगेटिव्ह आलाय, अभिनंदन! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv


*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv


*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR