1. कोरोनामुळं एसटीला 2300 कोटींचा फटका, लाखो कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न गंभीरतब्बल दीड हजार कर्मचाऱ्यांच्या सेवेला स्थगिती 


2. पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णयाला युवासेनेचं सुप्रीम कोर्टात आव्हान, प्रत्येक राज्याला परीक्षेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देण्याची मागणी 


3. डॉक्टर असल्याचे सांगून कोरोना सेंटरमध्ये महिलेचा बलात्कार, पनवेलच्या कोरोना सेंटरमधील धक्कादायक घटना, आरोपी आणि पीडित दोघेही वेगवेगळ्या मजल्यांवर अलगीकरणात ठेवलेले संशयित कोरोनाबाधित


4. गुजरातमधील कॉन्स्टेबल सुनीता यादवचं प्रकरण ताजं असतानाच, कोकणात खा. विनायक राऊत यांच्या मुलाची पोलिसांना शिवीगाळ; निलेश राणेंकडून शिवीगाळ असलेला व्हिडिओ ट्विटर वरुन शेअर, पोलिसांना कारवाई करण्याच्या खासदारांच्या सूचना 


5. 'बियाणे न उगवायला केवळ बियाणांना दोष का द्यायचा?', महाबीज कर्मचारी संघटनेच्या उलट्या बोंबा, सर्वेक्षणाशिवाय नवीन बियाणे देण्याला आक्षेप, गुन्हे दाखल होत असल्याने मनोबल खचत असल्याची भिती 


6. सुशांत सिंह राजूपत प्रकरणी मुंबई पोलिसांकडून यशराजच्या आदित्य चोप्रांची चार तास चौकशी, आतापर्यंत बॉलीवूडमधील दोन डझनपेक्षा जास्त लोकांची चौकशी 


7. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर राज्यातल्या नेत्यांची वर्णी लागणार का? देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे, आशिष शेलार, संभाजी पाटील निलंगेकर यांची नावे चर्चेत 


8. बकरी ईद संदर्भात राज्याच्या गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी, कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे सर्व बकरी बाजार बंद, ऑनलाईन खरेदीची मुभा.. नमाजही घरातून करण्याच्या सूचना 


9. केरळमध्ये काही भागात कोरोना व्हायरसचा कम्युनिटी स्प्रेड झाला असल्याची मुख्‍यमंत्री पी विजयन यांची कबुली, तिरुवनंतपुरम जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागात कडक लॉकडाऊन


10. इथे ओशाळली माणुसकी.. बेळगावात पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नीवर एकटीने अंत्यसंस्कार करण्याची वेळ


BLOG | केरळ आणि समूहसंसर्ग?, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग


माझा कट्टा | ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासोबत खास गप्पा, आज रात्री नऊ वाजता


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRenxBR