एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मे 2020 | गुरुवार

1. राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता, महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा, पावसाळ्यापूर्वीची खबरदारी म्हणून पाऊल 

2. कार्ड नसणाऱ्यांना 5 किलो रेशन मिळणार, केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा, शहरातील बेघर नागरिकांना तीन वेळचं जेवण देण्यात येणार 

3.तीन वर्षांची शॉर्ट सर्व्हिस सुरू करण्याचा भारतीय लष्कराचा प्रस्ताव, आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार, तर लष्कराच्या कामाचा अनेकांना अनुभव मिळणार 

4. कोरोना विषाणू कधीच नष्ट न होण्याची शक्यता , जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

5. कोल्हापुरातल्या शिरोलीत हजारो मजूर महामार्गावर, 15 दिवसांपासून अन्न मिळत नसल्याचा आरोप, प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर मजुरांच्या राहण्याची सोय 

6.काम नाही तर वेतन नाही हे धोरण सद्यस्थितीत लागू करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

7.दहशतवाद वाढविण्यासाठी पाकिस्तान जबाबदार, यामध्ये दुमत नाहीच; लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांचे मत

8. मजुरांवर काळाचा घाला, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये दोन अपघातांमध्ये घरी निघालेल्या 14 मजुरांचा मृत्यू

9. आर्थिक पॅकेजसाठी अभिनंदन, पण माझ्याकडूनही सरकारने पैसे घ्यावे; कर्जबुडव्या विजय मल्ल्याचं ट्वीट

10.देशात कोरोना बाधितांची संख्या 78 हजार पार; आतापर्यंत 2549 रुग्णांचा मृत्यू तर जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 44 लाखांवर

BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग

BLOG | लॉकडाऊन.. शुटिंग आणि कोल्हापूर!, सौमित्र पोटे यांचा ब्लॉग

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK