ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2020 | सोमवार




  1. पॉवरग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह एमएमआर भागात वीजपुरवठा खंडित, रस्ते आणि लोकल सेवेला फटका, तब्बल अडीच-तीन तासांच्या गोंधळानंतर काही भागात वीज पुरवठा पूर्ववत https://bit.ly/33O827m

  2.  मुंबईसह महानगरात वीज खंडित, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, तांत्रिक बिघाड कशामुळे झाला याची चौकशी करण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची ट्वीटवरुन माहिती https://bit.ly/2IpQ0Ad

  3. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप https://bit.ly/3nHc6OF

  4. वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेवर परिणाम, आजची परीक्षा उद्या होणार, महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना सूचना https://bit.ly/34NvDnY

  5. NEET परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबरला, कोविडमुळं हजर राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांची 14 तारखेला परीक्षा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर फेरपरीक्षेची तारीख जाहीर https://bit.ly/36YE2aW

  6. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी LTC च्या ऐवजी रोख रक्कम आणि सण-उत्सवासाठी बिनव्याजी दहा हजार रुपयांचा अॅडव्हान्स, केंद्र सरकारचा निर्णय https://bit.ly/3lDXEVG

  7. कोरोना लॉकडाऊनमुळे मुलांची लसीकरण मोहीम थंडावली; 28 वर्षांनंतर जुने रोग पुन्हा डोकं वर काढण्याची भीती https://bit.ly/3iRDd67

  8. नोटा, फोन स्क्रीनवर 28 दिवस कोरोना व्हायरस टिकू शकतो, संशोधकांचा दावा, ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायन्स एजन्सीचं संशोधन https://bit.ly/36ROf90

  9. पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल, ऑक्शन थेअरीतील सुधारणा आणि ऑक्शनच्या नव्या पद्धती शोधल्याबद्धल स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीच्या अर्थशात्रज्ञांनांचा सन्मान https://bit.ly/2GIRtB8

  10. IPL 2020 RCB vs KKR| शारजात आज कोहली विरुद्ध कार्तिक लढत, तर आज आंद्रे रसेल खेळणार; केकेआरचे ट्वीट https://bit.ly/2FmnYnX


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE- https://goo.gl/enxBR