एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2020 | मंगळवार


1.पालघरमध्ये आम्ही कडक कारवाई केली तशी तुम्हीही कराल अशी अपेक्षा, बुलंदशहरमध्ये साधूंच्या हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन 

2. कोविड 19 विषाणुंवर प्लाझ्मा थेरपी हा रामबाण उपाय नाही, सध्या ही थेरपी फक्त प्रायोगिक पातळीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण 

3. सर्व परीक्षांबाबत 10 मेपर्यंत निर्णय अपेक्षित, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याबाबत प्रयत्न करण्याचं सरकारला आवाहन

4. कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 100 एसटी बस पाठवणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती 

5.मुंबई पोलिस आयुक्तांचे 55 वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याचे आदेश, महाराष्ट्रात 112 पोलिसांना लागण झाल्यानं खबरदारी तर  ठाणे पोलीस दलातील मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी कोरोनामुक्त, सहकाऱ्यांकडून स्वागत 

6. कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ; संसर्ग वाढणं चिंतेची बाब, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती

7. कोरोनामुळे औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार महापालिकांवर प्रशासक नेमणार; राज्य निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र 

8.औरंगाबादमध्ये सामूहिक नमाजासाठी जमलेल्यांचा पोलिसांवर हल्ला; पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी 

9. बेस्टच्या एकूण 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, एकाचा मृत्यू तर बेस्टचा 250 जणांचा स्टाफ क्वॉरन्टाईन 

10. जगभरात 30 लाख कोरोना रूग्ण, एकट्या अमेरिकेत 10 लाख रूग्ण, तुर्कीपाठोपाठ रशियानंही ओलांडला चीनमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा

BLOG : माणूस 'लॉक', कोरोना 'डाऊन', पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex


Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK