एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 एप्रिल 2020 | बुधवार


1. डॉक्टरांवर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार, केंद्र सरकारचं मोठं पाऊल, तीन महिने ते सात वर्षांपर्यंत शिक्षा होण्याची शक्यता, 50 हजार ते 2 लाख पर्यंतचा दंड

2. केंद्र सरकारकडून राज्यांना रॅपिड टेस्ट थांबवण्याचे आदेश, चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटच्या चाचण्यांच्या निष्कर्षांमध्ये तफावत, दोन दिवसांत आठ संस्थांमार्फत किटची चाचणी होणार 

3. वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन काळ संपला, कुटुंबियांना सीबीआयला सोपवणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती 

4. राज्यात आतापर्यंत 722 रुग्ण कोरोनामुक्त; तीस ते पन्नास वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

5. नवी मुंबईत एकाच कंपनीत 19 कोरोनाबाधित, महापेमधील आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना लागण, तर मुंबईतल्या भाटिया रुग्णालयातल्या 10 जणांना कोरोना

6. महाराष्ट्रात आत्तापर्यत 64 पोलिसांना कोरोनाची लागण, 12 अधिकाऱ्यांसह 52 कॉन्स्टेबल कोरोनाबाधित, मुंबईतल्या 34 पोलिसांचा समावेश 

7. मुंबईतल्या मुलुंड-भायखळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, तर नागपूरमध्ये एकाच बसमधून तब्बल 57 लोकांचा प्रवास, नियमभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

8. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीला विरोध नाही, महाविकास आघाडीकडून राजकारण सुरू असल्याचा चंद्रकांत पाटील यांचा टोला 

9. नागपुरात रेशन मालाचा काळाबाजार उघड, गरीबांचा घास हिरावणाऱ्या दुकानदाराविरोधात गुन्हा

10. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 25 लाख 80 हजारांवर, तर मृतांचा आकडा 1 लाख 79 हजारांवर

BLOG | स्वच्छतेमुळे रोगराईला दूर ठेवलेलं कोलाम पोड, कपिल श्यामकुंवर यांचा ब्लॉग 

BLOG | आम्ही बिनधास्त काम करू, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग 

BLOG | पालघर : झुंडीच्या विकृतीचे बळी, निलेश झालटे यांचा ब्लॉग 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex


Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK