ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2025 | रविवार 


1. भाजप महाअधिवेशनात अमित शाहांचा शरद पवार, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, दगा फटका करणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली, अमित शाहांची टीका https://tinyurl.com/3bk3evrs राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं, महाअधिवेशनात भाजप नेत्यांचा महाविकास आघाडीवर घणाघात https://tinyurl.com/bdz9wrxm 


2. बीड जिल्ह्यात आणखी एका सरपंचाचा जीव गेला, राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू https://tinyurl.com/yc5x56rf परळीतील अवैध व्यवसायास पोलिस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी जबाबदार, त्यातूनच आणखी एक सरपंचाचा बळी गेला, भाजप आमदार सुरेश धसांचा आरोप https://tinyurl.com/mr2hwpy9  हा घातपात नव्हे तर अपघातच, यामागे कुठलाही संशय नाही,  सौंदाना गावच्या लोकांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/2dcd7rhu 


3. वाल्मिक कराडचा पिस्तूल परवाना रद्द, तर बीड जिल्ह्यातले 300 पिस्तूल परवानेही रद्द करण्यात आल्याची माहिती https://tinyurl.com/rn9stc6s  वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार, धनंजय मुंडेही संशयाच्या भोवऱ्यात, हार्वेस्टिंग मशीन अनुदानाच्या 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांचे पंढरपूर पोलिसांत तक्रारी अर्ज https://tinyurl.com/32we79ch 


4, अजितदादा, आख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या, शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारेंची धनंजय मुंडेंवर कारवाई करण्याची मागणी https://tinyurl.com/bdd5dy58 धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नावर अजितदादा भडकले, दोषी असल्यास कारवाई करण्याचं दादांचं आश्वासन https://tinyurl.com/2baeshmv 


5. विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सीआयडीकडून हस्तगत नाही, चाटेने मोबाईल नाशिकमध्ये फेकल्याची माहिती, मोबाईलबाबत केज कोर्टाकडूनही सीआयडीला सवाल https://tinyurl.com/2hu74xec   वाल्मिक कराडला मोक्का का लावला नाही? सुप्रिया सुळेंचा पोलिसांना प्रश्न, देशमुख आणि सूर्यवंशी हत्या प्रकरणावर संसदेत आवाज उठवणार असल्याचं आश्वासन  https://tinyurl.com/ztez6b3n 


6. तुमच्यातील लढाऊपणा हरवला, मी ओबीसींसाठी लढतोय पण माझ्यावर अन्याय झाला, छगन भुजबळांकडून पुन्हा खंत व्यक्त https://tinyurl.com/mrjnyhrt  मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद अॅक्टिव्ह मोडवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू https://tinyurl.com/2kbcvvxc 


7. महाविकास आघाडी तुटली असं म्हणालो नाही, काँग्रेस नेत्यांनी नीट ऐकावं, काँग्रेसच्या टीकेनंतर संजय राऊतांचे स्पष्टीकरण, पालिका निवडणूक ही स्वबळावर लढवावी ही कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं https://tinyurl.com/2pf5fryy 


8. अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोलकास येथील तीन हत्तीणी 15 दिवसांच्या विशेष रजेवर, या काळात पर्यटकांसाठी हत्ती सफारी बंद https://tinyurl.com/ycx4vsdw 


9. अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत 100 हून अधिक कामगारांना विषबाधा, प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचार सुरू, अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती https://tinyurl.com/3vkes877 


10. माजी क्रिकेटपटू देवजित सैकिया यांची BCCI च्या सचिवपदी निवड https://tinyurl.com/2p9j9u5v  ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे https://tinyurl.com/3z3amp85 



एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w