महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. सरकारनं समिती नेमल्यानंतरही एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम, सलग दुसऱ्या दिवशी राज्यभरात एसटी बंद


2. क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आज आर्यन खान एनसीबी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता, तर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकासमोर हजर राहण्याची शक्यता


3. नवाब मलिकाच्या विरोधात समीर वानखेडेंच्या वडिलांचा मानहानीचा दावा, ज्ञानदेव वानखेडेंच्या याचिकेवर उत्तर देण्याचे नवाब मलिकांना हायकोर्टाकडून निर्देश


4. वसुलीसाठी मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच किरण गोसावीनं स्वतःला एनसीबी अधिकारी सांगितलं, मुंबई पोलीस SIT पथकाची माहिती


5. मध्य प्रदेशच्या भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयात अग्नितांडव, लहान मुलांच्या वॉर्डला आग, 4 बालकांचा होरपळून मृत्यू
Bhopal Fire At Kamla Nehru Hospital : भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग घटनास्थळी स्वत: उपस्थित आहे. या घटनेत चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक मुले जखमी झाली आहेत. दरम्यान, कमला नेहरू रुग्णालयाबाहेर थांबलेल्या पालकांनी सांगितले की, 3-4 तास होऊनही त्यांना आपल्या मुलांची कोणतीही माहिती मिळालेली नाही.



6. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती भवन येथे सोमवारी सायंकाळी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरण सोहळयास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते. 


7. राज्यातील कोरोनाचा विळखा सैल होतोय, 24 तासांत 751 नवीन रुग्णांची नोंद तर 15 जणांचा मृत्यू


8. पेटीएमचा आयपीओ बाजारात दाखल; सबस्क्रिप्शन प्राईज 2080- 2150 रुपये


9. विरारमध्ये बर्फ बनविणा-या या फॅक्टरीमध्ये पाच कोटीची वीज चोरी , पाच जणांविरोधात गुन्हा


विरारच्या एका कारखान्यात पाच कोटीची वीज चोरी महावितरणाने उघड केली आहे. बर्फ बनविणा-या या फॅक्टरीमध्ये ही विज चोरी मागील पाच वर्षापासून सुरु होती. रिमोर्टद्वारे वीज वापरावर नियंञण करणारं सर्किट बसवून, ही वीज चोरी केली जात होती. याप्रकरणी महाविरणाने विरार पोलीस ठाण्यात कारखान्याच्या चार मालकांवर तसेच वीज चोरीची यंञणा बसवणा-याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


10. नामिबियाविरुद्धच्या विजयानं टीम इंडियाचं ट्वेन्टी 20 विश्वचषकातील प्रवासाची सांगता