1. शरद पवारांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री वनमंत्री संजय राठोडांवर कारवाई करणार का याकडे लक्ष, तपास होईपर्यंत राठोडांनी पदापासून दूर राहावे, पवारांनी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती


2. पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करताना राठोड समर्थकांकडून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली, 10 हजार जणांवर गुन्हा दाखल होणार, राठोडांकडून सारवासारव


3.मंत्रालयाच्या कार्यालयीन वेळा दोन शिफ्टमध्ये करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांना सूचना, कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबातही मुख्यमंत्र्यांचे निर्देश


4. शिर्डीत साईबाबादर्शनासाठी नवीन नियमावली, सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच दर्शन, तर द्वादशीला देखील पंढरपुरातलं विठ्ठल मंदिर बंदच राहणार


5. बुलडाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगावमध्ये 155 जणांना कोरोनाची लागण, धार्मिक कार्यक्रमातून संसर्ग



6. औरंगाबाद शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी, परभणी जिल्ह्यातून विदर्भात जाण्यावर निर्बंध, रत्नागिरीतही रात्री 9 नंतर संचारबंदी


7. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला, फळं महागण्याची शक्यता, मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या भाड्यात वाढ होणार, मुंबई मालवाहतूक टेम्पो महासंघाचा निर्णय


8. मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनसाठी 53 हजार ऐवजी केवळ 22 हजार तिवरांची झाडं तोडणार, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनची हायकोर्टात माहिती


9. पिस्तुलाचा धाक दाखवून जालन्याचे प्रसिद्ध उद्योगपती राजेश सोनी यांच्या अपहरणाचा प्रयत्न, आरोपींना बोलण्यात गुंतवून सोनी यांनी केली स्वतःची सुटका


10. जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर आजपासून भारत-इंग्लंड डे-नाईट कसोटी सामना, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन