देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. मराठा संघटनांचा उद्याचा बंद मागे; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय, सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने बंद मागे घेतल्याची सुरेश पाटील यांची माहिती


2. मराठा आरक्षण स्थगितीविरोधात आजपासून ठोक मोर्चाला सुरुवात, तुळजापुरात महिला मोर्चाचं आयोजन, संभाजीराजेंसह राज्यभरातील समन्वय उपस्थित राहण्याची शक्यता


3. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यास सरकार अनुकूल, मेटेंचा दावा, तर वेळेवर परीक्षा घेण्याची आंबेडकर आणि दलित महासंघाची मागणी


4. खोट्या टीआरपीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश, रिपब्लिक टीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, दोन मराठी चॅनल्सचे मालक अटकेत


5. लॉकडाऊननंतर पुणे-मुंबई रेल्वे अखेर रूळावर, आज सकाळी इंद्रायणी, तर उद्या सकाळी डेक्कन क्वीन पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 9 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार | ABP Majha



6. दिवाळीपर्यंत शाळा सुरु करणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, दिवाळीनंतर आढावा घेऊन शाळांबाबत निर्णय घेणार


7. मराठीतून बोलण्यास नकार देणाऱ्या सराफा विरोधात लेखिका शोभा देशपांडे यांचा कालपासून ठिय्या, पोलिसांच्या मदतीनं दुकानातून हुसकावून लावल्याचा आरोप


8. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं दीर्घ आजाराने निधन, दिल्लीतील रूग्णालयात अखेरचा श्वास


9. अमेरिकेच्या कवयित्री लुईस ग्लूक यांना साहित्याचा नोबल पुरस्कार जाहीर, फेथफुल अॅन्ड वर्च्युअस नाईट या काव्यसंग्रहासाठी गौरव


10. सनरायझर्स हैदराबादचा 69 धावांनी विजय, पंजाबकडून निकोलस पूरनची एकाकी झुंज अयशस्वी, आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी