1. पुण्यात देवाची ऊरळीमध्ये अग्नितांडव, साडीच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू


2. विधासभेला कोणासोबत जाणार नाही, वंचित बहुजन आघाडी सर्व जागा स्वतंत्र लढवणार, प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण

3. सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी राजीव गांधींकडून आयएनएस विराटचा वापर, पंतप्रधान मोदींचा गांधी घराण्यावर गंभीर आरोप

4.  लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यात पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी, जीएसटीवर बोलावं; काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींचं आव्हान

5. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या 130 ते 170 दहशतवाद्यांचा खात्मा, इटालियन पत्रकार फ्रान्सेस्का मॅरिनोच्या यांचा दावा



6. चंद्रकांत पाटलांमुळे भाजपप्रवेश टळला, उद्धव ठाकरेंबाबतच्या गौप्यस्फोटानंतर नारायण राणेंच्या आत्मचरित्रामधले नवे दावे उजेडात

7. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर महिलेकडून अंडंफेक, निवडणूक प्रचारादरम्यानची घटना, संबंधित महिला पोलिसांच्या ताब्यात

8. विदर्भात भारतीय हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी, उन्हाचा पारा 47 अंशावर जाण्याचा अंदाज, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

9. प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाची हत्या, आई गजाआड, अनैतिक प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरत असल्याने कृत्य, साताऱ्यातली धक्कादायक घटना

10. एलिमिनेटर सामन्यात दिल्लीचा हैदराबादवर दोन विकेट्सनी विजय, आयपीएल फायनलच्या तिकीटासाठी उद्या दिल्ली-चेन्नईचा मुकाबला