राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

  1. मान्सून केरळात दाखल, महाराष्ट्रात आठवडाभरानंतर धडकणार, सरकारच्या सूचनेनंतरच पेरणी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला


 

  1. उद्धव ठाकरे आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर, जालन्यातील चारा छावणीची पाहणी करणार


 

  1. मराठवाड्यातील दुष्काळ पुढची पिढी पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्धार


 

  1. ईव्हीएमवर विधानसभा निवडणूक झाल्यास बहिष्कार टाकणार, प्रकाश आंबेडकरांचं माझा कट्टयावर मोठं विधान, राहुल गांधींच्या नेतृत्त्वावरही घणाघात


 

  1. उद्धव ठाकरे दहावेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर बनू शकत नाही, कोर्टाच्या निर्णयानंतरच ते शक्य होईल, रामदास आठवलेंचं वक्तव्य


 

  1. दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांनी वडील आणि वहिनीची हत्या केली, चंद्रकांत खैरेंचा आरोप, लोकसभेतील पराभवामुळं खैरे भावूक


 

  1. CBSE, ICSE बोर्डाचे महत्त्व वाढवण्यासाठी दहावीचा निकाल घसरवला, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंचा आरोप


 

  1. विक्रोळीमध्ये फुटपाथवर झोपलेल्यांना टँकरनं चिरडलं, दुर्घटनेत दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू, 1 मजूर जखमी


 

  1. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात नियम धाब्यावर बसवून डान्सबार सुरु, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल


 

  1. विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सुपर सामना, 3 वाजता लंडनच्या ओवल मैदानात मॅच


 


व्हिडीओ :