Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 9 जानेवारी 2020 | बुधवार | ABP Majha


1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पालकमंत्र्यांची घोषणा, अजित पवार पुण्याचे, आदित्य ठाकरे मुंबई उपनगरचे पालकमंत्री, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाण्यासह गडचिरोलीची जबाबदारी

2. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचं पानीपत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींना धक्का, तर धुळ्यात भाजपची सरशी, कार्यकर्त्यांची जेसीबीतून गुलालाची उधळण

3. नंदुरबारमध्ये भाजप शिवसेना युती होणार, स्थानिक शिवसेना नेत्यांचे संकेत, तर वाशिम, पालघर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष

4. राज ठाकरे आणि भाजपच्या संभाव्य युतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मध्यस्थी असल्याची चर्चा, पुण्यात राज यांनी संघ पदाधिकाऱ्यांशी भेट घेतल्याची माहिती

5. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार चार दिवसांपासून नॉट रिचेबल, काँग्रेस नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न, उद्धव ठाकरेंकडून खात्यात बदलाचे आश्वासन, अजित पवारांची माहिती


6. एससी, एसटी आरक्षणाला मुदतवाढीसाठी सुधारणा विधेयकास मंजुरी, एक दिवसीय विशेष अधिवेशनात प्रस्ताव एकमताने संमत

7. चंद्रपूर आणि यवतमाळच्या काही भागात पुन्हा गारपीट, रब्बी पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

8. मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत तापमानात घट होऊन गारवा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

9. रामदास आठवलेंची रिपाइं दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक, भाजपकडे चार जागा मागण्याची शक्यता

10. इराणवर आर्थिक निर्बंध आणणार, इराणविरोधात चीन, जर्मनी, रशियाला एकत्र येण्याचं डॉनल्ड ट्रम्प यांचं आवाहन, इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ न देण्याचाही इशारा