देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. नाशिकच्या भद्रकाली स्टॅंड परिसरात जुना वाडा कोसळला, ढिगाऱ्याखाली अडकून एकाचा मृत्यू तर दोन जखमी

  2. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यात आजपासून हॉटेल्स सुरु होणार; राज्य शासनाचा निर्णय पंचतारांकित हॉटेल्सच्या फायद्याचा, हॉटेल ओनर्स असोसिएशनचा नाराजीचा सूर

  3. राज्यात लवकरच 10 हजार जागांसाठी पोलीस भरती, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा; तर एसआरपीएफची महिला बटालियलनही स्थापन करणार

  4. मुंबईतल्या ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात बैठक; महाविकासआघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचं शरद पवार याचं स्पष्टीकरण

  5. सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीसाठीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी; ऑनलाईनमुळे अभ्यासक्रम पूर्ण करणं अशक्य असल्याने मोठा निर्णय

  6. राज्यात काल दिवसभरात 5134 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 17 हजारांच्या पुढे, तर गेल्या 24 तासात 224 रुग्णांचा मृत्यू

  7. कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही, मुंबई आणि ठाणे महापालिकांचे सुधारित आदेश लागू

  8. जिवंत रुग्णाला मृत ठरवत दुसऱ्याचाच मृतदेह सोपवला; ठाण्यातला धक्कादायक प्रकार, तर तक्रार असलेल्या रुग्णाचा 3 जुलैलाच मृत्यू

  9. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद कोर्टात; परीक्षांसंदर्भात निर्णय घेण्याचा राज्य सरकारला काय अधिकार? हायकोर्टात याचिका

  10. बोगस बियाणे प्रकरणी कृषी सहसंचालक 13 तारखेला सुनावणीला हजर न झाल्यास अटक करून हजर करा, औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश