देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. मुंबई पूर्व उपनगरात गॅस गळतीमुळं दुर्गंधी, महापालिकेकडे अनेक तक्रारी, नागरिकांमध्ये भीती; आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं ट्विट

  2. राज्यात काल दिवसभरात 2739 नव्या कोरोना बाधितांची नोंद, राज्यातील एकूण रुग्णसंख्या 82,968वर; आतापर्यंत 37 हजार 390 रुग्णांना डिस्चार्ज

  3. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 जुलैपासून होणार; विद्यार्थ्यांना गावाजवळच्या महाविद्यालयात परीक्षा देण्याची मुभा; संकेतस्थळावर वेळापत्रक जारी

  4. यंदाची आषाडी वारी वारकऱ्यांविना; शहरातील 450 मठ आणि धर्मशाळांचे तपासणी सुरु, वारकऱ्याना शहरात प्रवेश न देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  5. उद्यापासून एसटीच्या अतिरिक्त 250 बसेस धावणार; खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांना देखील ओळखपत्र दाखवून प्रवास करण्याची मुभा

  6. मुंबईत येत्या आठ तारखेपासून बेस्ट बस सेवा पूर्ववत होणार, अत्यावश्यक सेवांसोबतच इतर नागरिकांसाठीही सेवा उपलब्ध; राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्णय

  7. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे माथेरानवासियांचे हाल, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा

  8. सम-विषम पद्धतीचा नियम असतानाही नाशिकात दुकानं सुरु; अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी तर नाशिकरांकडून सोशल डिस्टन्सिंगला हरताळ

  9. नागपूर जिल्ह्यात दिव्यांग अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात

  10. सीमा प्रश्नावर काल भारत आणि चीनमध्ये तब्बल साडे पाच तास बैठक; बैठकीतील चर्चा अजूनही गुलदस्त्यात