1. विप्रोचे चेअरमन अझीम प्रेमजी 30 जुलै रोजी निवृत्त होणार, 53 वर्षे यशस्वी धुरा सांभाळल्यानंतर कंपनीची सूत्रे मुलाकडे

2. रेपो रेटमध्ये कपात केल्याने कर्ज स्वस्त होणार, आरटीजीएस आणि एनईएफटी पेमेंटसाठी लागणारं शुल्कही रद्द, आरबीआयचा दुहेरी दिलासा

3. पुणे म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत, साडेचार हजारांपेक्षा जास्त सदनिकांसाठी सोडत, सकाळी 10 वाजता लाईव्ह प्रक्षेपण

4. राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिमंडळात एन्ट्री मिळावी म्हणून प्रकाश मेहतांची खुर्ची धोक्यात, राजकीय वर्तुळात कुजबुज, आज भाजपच्या राज्य कोअर कमिटीची बैठक

5. घरकुल घोटाळाप्रकरणी आज धुळे न्यायालयाचा निकाल येणार, 45 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी 93 संशयितांवर गुन्हा, सुरेश जैन, गुलाबराव देवकरांचं भविष्य टांगणीला



6. शरद पवार आज दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटणार, निरा कालव्यातून बारामतीसाठी बंद झालेल्या पाण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता

7. 2023 नंतर दुचाकी तर 2026 नंतर चारचाकी वाहनं इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा विचार, वायू प्रदूषण रोखण्यासाठी निती आयोगाचा प्रस्ताव

8. अहमदनगरमध्ये शेततळ्यात बुडून तिघा भावांचा मृत्यू, पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरी गावातली घटना, परिसरात हळहळ

9. धोनीला ग्लोव्हजवरचा बलिदान बॅज काढायला सांगण्याची आयसीसीची बीसीसीआयला विनंती; सेनादलाचा बॅज वापरणं नियमात न बसणारं, आयसीसीचा खुलासा

10. सहा वर्षांत 85 रुग्णांचे प्राण घेणाऱ्या जर्मनीतील पुरुष नर्सला 15 वर्षांचा तुरुंगवास, इंजेक्शन देऊन रुग्णांचे प्राण घेतल्याचा नील्स होगलवर आरोप