राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये 


चंद्रापासून विक्रम लँडर 2.1 किमीवर असताना संपर्क तुटला, लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, इसरोची माहिती

बंगळुरुत इस्रो सेंटरवर पंतप्रधान मोदींनी उंचावलं शास्त्रज्ञांचं मनोधैर्य, देशाला तुमचा अभिमान, संपूर्ण देश वैज्ञानिकांच्या पाठीशी

मुसळधार पावसामुळं नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा रद्द,  मेट्रोचं लोकार्पण रखडण्याची शक्यता, मात्र मोदींचा मुंबई दौरा कायम

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावणार नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, टुरिझमला चालना देण्यासाठी  25 एेतिहासिक स्थळं भाडेतत्वावर देणार

विधानसभेच्या तोंडावर वंचित आघाडीत फूट,अपेक्षित जागा मिळत नसल्यानं एमआयएमचा स्वबळाचा नारा, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष

नागपुरात आज अतिवृष्टीचा इशारा, जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर, मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाचा जोर कायम

राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, पंचगंगेची पाणीपातळी वाढली, कोल्हापुरात एनडीआरएफ टीम तैनात

अनुसूचित जमातींच्या 13 योजना धनगर समाजाला लागू, राज्य सरकारचा शासन निर्णय जाहीर

वंचितचे कार्यकर्ते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंचं वक्तव्य

मुंबईत एका वर्षात विविध दुर्घटनांमध्ये 137 लोकांचा मृत्यू, 579 जखमी, आरटीआयमधून मिळाली माहिती