- महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प, सकाळी 11 वाजता अजित पवार बजेट मांडणार
- आरबीआयच्या परवानगीशिवाय येस बँकेतून 50 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर निर्बंध, बँकेला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी केंद्राचं एसबीआय आणि एलआयसीला साकडं
- सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिक बँकेत वळवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना हायकोर्टाची नोटीस, उत्तरासाठी आठ आठवड्यांचा अवधी
- नाशिकमध्ये कोरोनाचा चौथा संशयित रुग्ण, देशभरात 30 जणांना कोरोनाची लागण, तर कोरोना प्रतिबंधासाठी सरकार सज्ज, नागरिकांनी भीती न बाळगण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
- नागपाड्यात पोलीस आणि सीएए विरोधातील आंदोलकांमध्ये वाद, आंदोलनस्थळी लावलेल्या मंडपावरुन हुज्जत, आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे पोलीस माघारी
- मिशन मुंबईच्या पहिल्याच रणनीतीत भाजप फसली, विरोधी पक्षनेते पदाचा दावा महापौरांनी फेटाळला, भाजप न्यायालयात जाण्याच्या तयारीत
- ठाणे मेट्रोच्या मार्गावरील झाडं रातोरात गायब झाल्याचा पर्यावरणप्रेमींचा दावा, न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचाही आरोप
- वारंवार गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याचा दणका, कुपवाड्याजवळच्या चौक्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आणि तोफगोळे डागून उद्धस्त
- गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन, उर्वरित सत्रात सहभाग घेता येणार नाही, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचा निर्णय
- भारतीय महिला संघाची पहिल्यांदाच टी 20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाशी 8 मार्चला होणार अंतिम मुकाबला