1. ठाण्यात सहा महिन्यांच्या बाळाची कोरोनावर मात, 14 दिवसांच्या उपचारांनंतर सिव्हिल रुग्णालयातून डिस्चार्ज, टाळ्या वाजवून कर्मचाऱ्यांकडून बाळाला निरोप


2. राज्यात 771 कोरोनाबाधितांची नोंद, तर 350 रुग्ण कोरोनामुक्त, महाराष्ट्र 15 हजार रुग्णांच्या उंबरठ्यावर, देशभरात 27.52 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती


3. जगभरात कोरोनाचे 36 लाखांपेक्षा जास्त रुग्ण, बळींची संख्या अडीच लाखांच्या पार, एकट्या अमेरिकेत मृतांची संख्या 70 हजारांच्या घरात


4. वरळी आणि डिलाईल रोडमधील बीडीडी चाळी किमान आठ दिवस पूर्णत: लॉकडाऊन करण्याची गरज, मुंबईच्या महापालिका प्रशासनाचं पोलिसांना पत्र


5. डॉक्टर, मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही 50 लाखांचा विमा आणि दिवसाला किमान 300 रुपयांचा भत्ता द्या, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची हायकोर्टात याचिका


6. पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळता शहरात वृत्तपत्र वितरणाला सशर्त परवानगी, घरोघरी वितरणासाठी सकाळी 7 ते 10 ची वेळ, वितरण करणाऱ्याने मास्क घालणे आणि सॅनिटायझर लावणं बंधनकारक


7. दिल्लीत आजपासून दारु महागणार, MRP वर 70 टक्के 'विशेष कोरोना शुल्क', नियम पायदळी तुटवड दारुच्या दुकानांसमोरील गर्दीमुळे केजरीवाल सरकारचा निर्णय


8. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना विमानं आणि नौदलाच्या जहाजातून मायदेशी आणणार, 7 मे पासून टप्याटप्याने मोहीमेला सुरुवात


9. महसूल घटल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम, विविध विभागात नव्या नोकर भरतीवर बंदी, तर नव्या योजनांवर खर्च न करण्याच्या सूचना


10. विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन जागासांठी अनेक जण इच्छुक, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकरांसह शशिकांत शिंदेंचंही नाव चर्चेत