1. ठाकरे सरकारच्या खातेवाटपाचा गुंता सुटला, आज खातेवाटप होण्याची शक्यता, परिवहन, कृषी खातं शिवसेनेकडेच, तर काँग्रेसला बंदरे, खारभूमी आणि सांस्कृतिक खातं
2. कायदेशीर पेच झाल्यानं औरंगाबाद झेडपीसाठी आज पुन्हा मतदान, बीड जिल्हा परिषदेसाठी धनंजय मुंडेंकडून मोर्चेबांधणी सुरु, जळगाव झेडपीवर पुन्हा भाजपचा झेंडा
3. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकरांची तब्येत बिघडली, उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यानं माहीम येथील रहेजा फोर्टीस रुग्णालायत दाखल
4. नागरिकत्त्व कायद्याबद्दलचा अभ्यास कमी असेल तर चर्चा करा, गृहमंत्री अमित शाहांचं राहुल गांधींना आव्हान, नागरिकता कायदा मागे घेणार नसल्याचंही स्पष्ट
5. आमदारांच्या पगार आणि पेन्शनसाठी 2 वर्षात 500 कोटी खर्ची, एसटीच्या कर्मचाऱ्यांवर मात्र उपासमारीची वेळ, कोट्यधीश आमदारांना पेन्शन कशाला, सामान्यांना सवाल
6. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचा सेनेला धक्का, काँग्रेस-मनसेच्या मदतीनं स्थायी समितीचं सभापतीपद काबीज, शिवसेनेच्या एका नगरसेवकाची ऐनवेळी दांडी
7. प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती बिगुल वाजलं, आमदार महेश लांडगेंच्या हस्ते स्पर्धेचं उद्धघाटन, पुण्यातल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात पैलवानांचा शड्डू
8. काँग्रेसच्या सेवादलाच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, सावरकरांचे नातू आक्रमक, फडणवीस आणि पाटलांचा काँग्रेस, शिवसेनेवर हल्लाबोल
9. जळगाव जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपचा झेंडा, खडसे-महाजनांचा जल्लोष, औरंगाबादेत कायदेशीर पेच, तर बीड जिल्हा परिषदेसाठी धनंजय मुंडेंकडून मोर्चेबांधणी सुरू
10. रितेश आणि जेनिलियाच्या तुझे मेरी कसम चित्रपटाला 17 वर्षे पूर्ण, लातूरच्या बाभळगावातील शेतात ट्रॅक्टरवर दोघांचा हटके डान्स