स्मार्ट बुलेटिन | 2 एप्रिल 2019 | मंगळवार | एबीपी माझा


1. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर, रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांचा एकाच विमानातून मुंबई प्रवास,  राजकीय चर्चांना उधाण

2. येत्या 15 दिवसांत मोठा राजकीय निर्णय घेणार, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत राधाकृष्ण विखे पाटलांचं सूचक वक्तव्य

3. ज्यांनी स्वतः कधी घर चालवलं नाही ते माझ्या घराबद्दल बोलतायत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर टीका

4. साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसलेंना मनसेकडून पाठिंबा जाहीर, खुद्द उदयनराजेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन माहिती

5. किरीट सोमय्यांचा पत्ता कट, ईशान्य मुंबईतून मनोज कोटकांना उमेदवारी, तिकीटासाठी मातोश्रीची मनधरणी केली नसल्याची सोमय्यांची स्पष्टोक्ती


6. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज केरळच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार, संध्याकाळी 6 वाजता नागपुरात जाहीर सभा

7. तिहार कारागृहातील कैदी पोलखोल करेल याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना भीती, गोंदियातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप

8. राहत्या घरी निर्दयीपणे आईची हत्या करणाऱ्या मुलाला अखेर जामीन, 25 हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे हायकोर्टाचे आदेश

9. मुंबई सत्र न्यायालयाशेजारील धोकादायक इमारत 15 मेपर्यंत खाली करा, गरज भासल्यास पोलीस बळाचा वापर करा, हायकोर्टाचे निर्देश

10. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर 37 धावांनी विजय, केदार जाधवची एकाकी झुंज, चेन्नईची विजय घोडदौड रोखण्यात मुंबईला यश