2. सहकाऱ्यांची साथ नसल्याने देवेंद्र फडणवीस एकाकी, संजय राऊतांचं वक्तव्य, तर सर्वजण साथीला असल्याचा गिरीश महाजनांचा दावा
3. सरकार स्थापन करण्यास भाजप अपयशी ठरल्यास शिवसेना सत्तास्थापनेसाठी पाऊल उचलेल, 'माझा कट्ट्या'वर संजय राऊतांचं मोठं विधान, परतीचे दोर कापल्याचे म्हणत भाजपला इशारा
4. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, तर उद्या दिल्लीत होणाऱ्या पवार आणि सोनिया गांधींच्या भेटीकडेही लक्ष
5. अवकाळी पावसामुळे राज्यभरात लाखो हेक्टर क्षेत्रात पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल, पंचनामे सुरु
6. कागदपत्रे पूर्ण करा मगच कारवाई, विमा अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांना उत्तरं, लातुरात शेतकऱ्यांचे हाल
7. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून 10 हजार कोटींची मदत जाहीर, मदत तोडकी असल्याचा विरोधकांचा आरोप, आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पाहणी दौऱ्यावर
8. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाबाहेर पोलीस आणि वकिलांमध्ये धुमश्चक्री, पार्किंगच्या वादातून कोर्ट परिसरातच पोलिसांचा गोळीबार, संतापलेल्या वकिलांकडून तोडफोड
9. नाशिकमध्ये कोथिंबीरच्या जुडीला 280 रुपयांचा भाव, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 100 जुड्यांना तब्बल 28 हजारांचा दर, अवकाळी पावसामुळे दर गगनाला
10. सुपरस्टार रजनीकांत यांच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली ऑफ इफ्फी' पुरस्कार जाहीर