1. भाजपवर दबावतंत्र वापरणारी शिवसेना अचानक बॅकफूटवर, महायुतीत राहण्यातच भलं, मुख्यमंत्रीपदाची मागणी रेटून धरणाऱ्या संजय राऊतांचा सूर नरमला


2. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह 13 खाती देण्याची भाजपची तयारी, सूत्रांची माहिती, मुख्यमंत्रीपदासह गृह, अर्थ, महसूल, नगरविकास खातं भाजपकडेच राहणार


3. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची निवड तर राष्ट्रवादी विधिमंडळ नेतेपदी अजित पवार


4. शिवसेनेच्या विधीमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे कायम राहण्याची शक्यता, तर काँग्रेसची आज बैठक


5. राजकारणात कुणीच कुणाचा मित्र वा शत्रू नसतो, सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं सूचक वक्तव्य, सध्या विरोधी पक्षातच बसणार असल्याचं स्पष्ट



6. वीज अंगावर पडून राज्यभरात 7 जणांचा मृत्यू तर अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी, द्राक्षबागांचं प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर


7. अंबेनळी घाटात एसटी दरीत कोसळण्यापासून वाचली, दैव बलवत्तर म्हणून 70 प्रवासी बचावले, 12 जण जखमी


8. आजपासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन नवे केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये गिरीश चंद्र मुर्मू तर लडाखमध्ये आर. के. माथुर यांची उपराज्यपालपदासाठी शपथ


9. सरदार वल्लभभाई पटेलांच्या 144 व्या जयंतीनिमित्त आज देशभरात 'रन फॉर युनिटी'चं आयोजन, दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शाह तर मुंबईत मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची हजेरी


10. इंडिगो तब्बल 300 विमाने खरेदी करणार, कंपनीला हवाई वाहतूक क्षेत्रात जलद विकासाची अपेक्षा