स्मार्ट बुलेटिन | 31 मे 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

  1. नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात, राष्ट्रपतींनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ, राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा संपन्न


 

  1. एनडीएच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अमित शाहांना मंत्रिमंडळात स्थान, गडकरी, राजनाथ सिंह, सीतारमण यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ


 

  1. महाराष्ट्रातल्या 7 नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी, गडकरी, गोयल आणि जावडेकरांना मिळणार महत्त्वाची खाती, शिवसेनेच्या अरविंद सावंतांनाही कॅबिनेट


 

  1. शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना चक्क पाचव्या रांगेतला पास, लक्ष वेधूनही जागा बदलून दिली नाही, पवारांची शपथविधी सोहळ्याला गैरहजेरी


 

  1. राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही, राहुल गांधींच्या भेटीबाबत पवारांचे स्पष्टीकरण




  1. मी जिथे जाईन तिथे निवडणुकीला उभा राहीन का? विधानसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर शरद पवार यांचे नातू रोहित पवारांचा सवाल


 

  1. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आघाडीत घेण्याच्या हालचालींना वेग, शरद पवारांनंतर आता काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे कृष्णकुंजवर


 

  1. मुंबईतील वातानुकूलित लोकलची उद्यापासून दरवाढ, लोकलचे सिंगल तिकीट किमान ६65 तर कमाल तिकीट 200 रुपये, पश्चिम रेल्वेची माहिती


 

  1. विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला एकहाती विजय मिळवून देणारे वायएस जगनमोहन रेड्डी यांनी घेतली आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ


 

  1. विश्वचषकाच्या सलामीलाच यजमान इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर 104 धावांनी दणदणीत विजय, इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सची अष्टपैलू कामगिरी निर्णायक