- ठाकरे सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 36 आमदार शपथ घेणार, विधान भवन परिसरात शपथविधीसाठी जय्यत तयारी
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 डिसेंबर 2019 | सोमवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 30 Dec 2019 11:17 AM (IST)
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 डिसेंबर 2019 | सोमवार | एबीपी माझा 6. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी पोलिसांचा 'मास्टर प्लान', पोलिसांकडून 250 व्हॉट्सअॅप ग्रुप्सना नोटीस तर फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट 7. पिंपरीत मेट्रो डब्यांच्या पूजनावेळी मानापमान नाट्य, मेट्रोच्या नावातच पिंपरीचा उल्लेख नसल्यानं महापौर उषा ढोरे संतापल्या, मेट्रो चाचणी होऊ न देण्याचा महापौरांचा इशारा 8. मुंबईतून तब्बल 26 खासगी रेल्वे धावणार, रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न, 10 ते 15 दिवसात खासगी रेल्वेसाठी निविदा निघणार 9. विदर्भाच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत घट, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा इशारा 10. बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतला सर्वोच्च सन्मान, बिग बींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती भवनात रंगला पुरस्कार सोहळा