देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. पार्थची भूमिका ही राष्ट्रवादीची भूमिका नाही, पार्थ पवार यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या ट्वीटवरुन अजित पवार यांचं स्पष्टीकरण


2. एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत मिळणार, उर्वरित पगाराबाबतही लवकरच निर्णय, परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा


3. हाथरसला पायी निघालेल्या राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्याचे देशभरात पडसाद, आज राज्यात काँग्रेस नेत्यांचं आंदोलन, कृषी विधेयकाचाही निषेध करणार


4. बलात्कार झाल्याची हाथरसच्या पीडितेची माहिती, मृत्यूपूर्वीचा अखेरचा व्हिडीओ हाती, तर बलात्कार झाला नाही, यूपीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा दावा


5. हाथरस बलात्कार प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून सीबीआय चौकशीची मागणी, प्रशासन दबाव टाकत असल्याचाही वडिलांचा आरोप


6. महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का? हाथरस घटनेवरुन राज ठाकरे यांचा प्रसारमाध्यमं आणि उत्तर प्रदेश सरकारला सवाल


7. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राजघाटावर अभिवादन, लाल बहादूर शास्त्री यांनाही आदरांजली


8. मुंबईतील कोविड संदर्भातील सेरो सर्वेक्षणाचा दुसरा अहवाल प्रसिद्ध, झोपडपट्टी परिसरातील कोरोना संसर्गात काही प्रमाणात घट, बिगर झोपडपट्टी क्षेत्रात वाढ


9. पाचव्या अनलॉकमध्येही राज्यातील मंदिरांना टाळे कायम, निर्णय न झाल्याने शिर्डी ग्रामस्थ आणि व्यापारी नाराज


10. मुंबई इंडियन्सकडून किंग्ज इलेव्हन पंजाबचा 48 धावांनी पराभव; रोहित, पोलार्डच्या दमदार खेळीने मुंबईचा सहज विजय