1. देशात लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवला, शाळा, मॉल्स, रेल्वे, चित्रपटगृह बंदच राहणार; ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात सूट

  2. महाराष्ट्रात काल 1008 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, एकट्या मुंबईत 751 रुग्ण; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 11,506 वर

  3. कोरोनामुळे जगभरात एकूण 2 लाख 39 जणांचा मृत्यू, एकट्या अमेरिकेत 24 तासांत सर्वाधिक 1900 जणांचा मृत्यू

  4. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थ्यांसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या; नाशिकमधील मजुरांना घेऊन ट्रेन भोपाळकडे रवाना

  5. राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये 4 मे पासून दारू विक्रीस परवानगी, अटी आणि शर्ती पाळाव्या लागणार; रेड झोनमध्ये निर्बंध कायम

  6. महाराष्ट्रात अंतर्गत प्रवास करण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली; कंटेनमेंट झोन असलेल्या शहरात किंवा जिल्ह्यातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नाही

  7. लॉकडाऊन किती दिवस वाढवणार? कोरोना असा संपणार नाही; एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं वक्तव्य

  8. डीएचएफएल आणि येस बँक गैरव्यवहार प्रकरणी वाधवान बंधूंचा जेलमधील मुक्काम वाढला; सीबीआय कोठडीत 8 मे पर्यंत वाढ

  9. राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा, उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा

  10. पुण्यात विविध भागात शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शिवाजीनगर भागात गारांचा पाऊस झाल्याचीही माहिती