Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 जानेवारी 2020 | गुरुवार



    1. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांमुळे माझं तिकीट कापलं, एबीपी माझाशी बोलताना एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, आपलं राजकारणं संपवल जात असल्याचा घणाघाती आरोप

    2. तीन बैठका आणि चार तासांच्या खलबतानंतर अखेर खातेवाटप ठरलं, आज जाहीर होण्याची शक्यता, अजित पवारांची माहिती, तर कुठलेही मदभेद नसल्याचा जयंत पाटलांचा दावा

    3. महाविकास आघाडीच्या संभाव्य खातेवाटपाची यादी माझाच्या हाती, महत्वाच्या खात्यासाठी काँग्रेसचा आग्रह, सामनाच्या अग्रलेखामधून शिवसेनेचं काँग्रेसवर टीकास्त्र

    4. मंत्रिपदापासून वंचित राहिल्यानं शिवसेनेचे डझनभर आमदार नाराज असल्याची चर्चा, तर तानाजी सावंत आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद झाल्याचीही माहिती

    5. अधिकाऱ्यांनो सावधान, सेवा हमी कायद्याचं पालन झालं नाही तर गाठ माझ्याशी, राज्यमंत्री बच्चू कडू यांचा इशारा






  1. काँग्रेस भवनातील तोडफोडीशी माझा संबंध नाही, आमदार संग्राम थोपटेंची प्रतिक्रिया तर राडा घालणाऱ्यांवर काँग्रेसकडून अद्यापही कुणावर कारवाई नाही

  2. नांदेड, हिंगोली, वाशिममध्ये अवकाळी पाऊस, तर मुंबई, नाशकात थंडी, पश्चिम महाराष्ट्रातही गारठा

  3. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट, एका क्लिकवर आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अकरा हजार कोटी रुपये

  4. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना गूडन्यूज, दहिसर-डीएन नगर, दहिसर-अंधेरी मेट्रो वर्षअखेरीस रूळावर, लोकलवरील 35 टक्के भार कमी होणार

  5. बँकांना कोट्यावधींचा चुना लावणाऱ्या विजय मल्ल्याला झटका, संपत्ती विकून बँकांना वसुली करणार, पीएमएलए कोर्टाकडून एसबीआयला परवानगी