- राज्यात काल कोरोना बाधितांपेक्षा कोरोना रुग्णांची बरी होण्याची संख्या अधिक; 10 हजार 725 रुग्णांना डिस्चार्ज तर 9 हजार 500 नवे कोरोना बाधित
- जगात कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी 80 लाखांवर त्यातील एक कोटी 13 लाख बरे झाले, सध्या 60 लाख अॅक्टिव्ह केसेस
- गणेशोत्सावासाठी चाकरमानी कोकणात निघाले, मुंबई-गोवा मार्गावर रत्नागिरीच्या चिपळून तर सिंधुदुर्गातील खारेपाटण तपासणी नाक्यावर गर्दी
- पुण्यातील चाकण एमआयडीसीत कोरोनाचा कहर, एकाच कंपनीत 110 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ
- मास्क आणि सॅनिटायजर किमतींच्या नियंत्रणासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडून दोन मोठ्या घोषणा; तळेगावमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्क तर माणगावमध्ये फार्मा पार्क सुरु करणार
- सुशांत सिंह प्रकरणात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूडच्या दबावाखाली, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप
- राममंदिर भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली, चौकाचौकात रोशणाई; पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने कडक सुरक्षाव्यवस्था
- टिकटॉकला देशी पर्याय, पुण्यामधील इंदापुरातील युवकाने तयार केलं नवं ‘टिक टॅक’ अॅप
- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई टोपे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास