स्मार्ट बुलेटिन | 29 ऑक्टोबर 2019 | मंगळवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 29 Oct 2019 11:10 AM (IST)
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. सत्तास्थापनेपूर्वीच सामनातील टीकेवरुन भाजप-शिवसेनेत तणाव, टीका थांबली तरच चर्चा करु, भाजपची शिवसेनेसमोर अट, तर भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या दौऱ्याबाबतही अनिश्चितता 2. एकनाथ खडसे राजकीय जीवनातील अनेक पदर उलगडणार, आत्मचरित्र लिहीणार, तर पक्षाकडून न्याय मिळण्याचीही आशा 3. संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही, काँग्रेस नेते सत्यजित तांबेंचा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना सल्ला 4. पंकजा मुंडेंना पराभूत होऊनही मंत्रीपद मिळण्याची शक्यता, भाजपच्या गोटात हालचाली सुरु, सूत्रांची माहिती 5. बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक विमानसेवेला सुरुवात, पहिल्या विमानातून पुण्यासाठी 15 जणांनी तर परतीच्या प्रवासावेळी 38 जणांचा प्रवास 6. गुडविन प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवणार, डोंबिवली पोलिसांची माहिती, 69 जणांच्या 3.87 कोटींची फसवणुकीची तक्रार 7. देवेंद्र फडणवीसांऐवजी चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री करा, काँग्रेस नेते आशिष देशमुखांची मागणी 8. दिवाळीतही उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम, नाशिकमध्ये पावसामुळे रस्ते तुंबले, बीड आणि जालन्यात गारपीट, हिंगोलीत पिकांचं मोठं नुकसान 9. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीची नोटीस, इक्बाल मिर्ची प्रकरणात कुंद्रा अडचणीत, 4 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश 10. गेल्या 15 वर्षात मुंबईमध्ये सर्वात कमी ध्वनीप्रदूषण, आवाज फाऊंडेशनचा अहवाल, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजनाला कमी प्रदूषणाची नोंद