देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

Continues below advertisement


1. स्थलांतरित मजुरांच्या तिकीटाचा आणि जेवणाचा खर्च राज्यांनी करावा, सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना मोठा दिलासा


2. 31 तारखेनंतर मेट्रो सलून आणि धार्मिक स्थळं सुरु करा, कॅबिनेट सचिवांच्या बैठकीत काही नियम शिथील करण्याची काही राज्यांची मागणी


3. मुंबईतील हॉटस्पॉटमध्ये कोरोना रुग्णांचा ग्रोथ रेट मंदावला, प्रथम क्रमांकावर असलेला वरळीचा समावेश असलेला जी साऊथ वॉर्ड 7 व्या क्रमांकावर


4. राज्यात 2598 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 60 हजारांच्या उंबरठ्यावर, दिवसभरात 85 रुग्णांचा मृत्यू


5. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यात महाराष्ट्र सरकारला यश, सर्व्हेक्षणातून माहिती समोर, मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांचं सर्व्हेक्षण


6. कोरोना विषाणू संसर्गावर लस तयार करण्यामध्ये भारताची प्रगती, नीती समितीचे सदस्य डॉक्टर वी. के. पॉल यांची माहिती, मात्र लस तयार झाल्यानंतरही लगेच लोकांना उपलब्ध होणे अवघड


7. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचं देशाच्या नावे पत्र, आत्मनिर्भर भारत आणि कोरोना विरोधात एकजुटीसाठी मोदींचं आवाहन


8. यंदा 1 जूनला मान्सूनचं केरळमध्ये आगमन होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज, मान्सून वेळेत दाखल होणार असल्यामुळे बळीराजाला दिलासा


9. मुंबईत टोळधाड आल्याचे खोटे व्हिडीओ व्हायरल, मेसेज पुढे न पाठवण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र टोळांचा उच्छाद


10. चीन आणि भारत वादावर पंतप्रधान मोदी नाखूश, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य, मोदींशी संवाद झाल्याचाही ट्रम्प यांचा दावा