देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...




  1. ईडीच्या नोटीसला जशास तस उत्तर देण्याची संजय राऊत यांची भाषा; वर्षा राऊत आज चौकशीसाठी हजर राहणार का याकडे सर्वांच लक्ष



  1. सीरम इन्स्टिट्युटकडे कोरोना लसीचे पाच कोटी डोस, जास्तीत जास्त भारतीयांना देण्यात येणार; अदर पुनावालांची माहिती



  1. कांदा निर्यातीवरची बंदी केंद्र सरकारने उठवली, 1 जानेवारीपासून कांदा निर्यात करण्यास परवानगी, उत्पादकांना मोठा दिलासा



  1. भारत भालकेंच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार, अजित पवारांची स्पष्टोक्ती



  1. कोविड - 19 च्या निर्बंधामुळे यंदा नवीन वर्षाच्या स्वागत पार्ट्यांना परवानगी नाही, मुंबई पोलिसांची माहिती



  1. अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर, मुंबई विभागातून 59,322 विद्यार्थ्यांना मिळाले महाविद्यालय



  1. सार्वजनिक हित पाहता कोस्टल रोड प्रकल्प थांबवता येणार नाही, मुंबई सत्र न्यायालयानं कोस्टल रोडला आक्षेप घेणारी याचिका फेटाळली



  1. पार्थो दासगुप्ता-अर्णब गोस्वामींमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय; पार्थो दासगुप्तांच्या पोलीस कोठडीत वाढ



  1. प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियांना मुंबई पोलिसांकडून अटक, फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोप



  1. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 200 धावांत आटोपला; भारतासमोर विजयासाठी 70 धावांचं लक्ष्य