स्मार्ट बुलेटिन | 29 डिसेंबर 2019 | रविवार | एबीपी माझा

1. दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र, जीआरमधल्या पाचव्या मुद्यामुळे सरकारवर टीका, शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप

2. उद्धव ठाकरे सरकारचा उद्या पहिला मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष

3. बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करणार होते, विखे पाटलांचं वक्तव्य, तर अशा वक्तव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, बाळासाहेब थोरातांचं उत्तर

4. कल्याणमध्ये भाजप आमदाराच्या कार्यक्रमात भाजपाच्या नेत्यांसोबत अजित पवारांचा फोटो, अनेकांच्या भुवया उंचावल्या

5. बेळगावमध्ये कर्नाटक नवनिर्माण सेनेचा उन्माद सुरुच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकृतीचं दहन, मराठी पाट्यांचीही तोडफोड



6. लखनौ पोलिसांनी गळा दाबत धक्काबुक्की केल्याचा प्रियंका गांधींचा आरोप, पोलिसांनी अडवल्यानंतर प्रियंका गांधी स्कूटीवरुन रवाना

7. राष्ट्रीयीकृत बँकांची स्थिती सुधारली, 13 बँकां पहिल्या सहामाहीत नफ्यात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

8. उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीनंतर महाराष्ट्रही गारठला, नागपुरात सर्वात कमी 5.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, मुंबईत थंडीचं प्रमाण कमीच

9. चोराला विरोध करणाऱ्या औषधांच्या दुकान मालकावर गोळीबार, ठाण्याच्या कळव्यातील घटना, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्य सीसीटीव्हीत कैद

10. ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखवल्याप्रकरणी रवीना टंडन, फराह खान आणि भारती सिंगविरोधात बीडमध्ये गुन्हा, टीव्ही मालिकेतल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर आक्षेप