स्मार्ट बुलेटिन | 28 सप्टेंबर 2019 | शनिवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2019 11:02 AM (IST)
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये 1. गलिच्छ राजकारणामुळे अस्वस्थ होत अजित पवारांनी राजीनामा दिल्याचा शरद पवारांचा दावा, तर अजितदादांनी मुलांना राजकारण सोडण्याचा सल्ला दिल्याचीही माहिती 2. पवार कुटुंबात कोणतेही वाद नाही, गृहकलहामुळे अजितदादांनी राजीनामा दिल्याच्या चर्चेचं शरद पवारांकडून खंडन, माझाच शब्द अंतिम असल्याच पवारांकडून स्पष्ट 3. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक, शदर पवार मात्र बैठकीला गैरहजर 4. शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपचा तिढा कायम, रंगशारदामध्ये शिवसैनिकांची बैठक, युतीबद्दल चर्चा होण्याची शक्यता 5. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीचे दरवाजे बंद, एमआयएमकडून औरंगाबाद शहरातील तिन्ही मतदारसंघातील उमेदवार घोषित 6. भारताने जगाला बुद्ध दिला युद्ध नाही, संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून मोदींकडून पाकला सूचक इशारा, भारताच्या कामगिरीचाही पंतप्रधानांनी वाचला पाढा 7. भारतीय नौदलाची ताकद वाढली, आयएनएस खांदेरी पानबुडी ताफ्यात दाखल, राजनाथसिंहांच्या हस्ते लोकार्पण 8. पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीतील मृतांची संख्या 18 वर तर 7 जण बेपत्ता, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती 9. नागपूर जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांची निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर बदली, काँग्रेस नेते नाना पटोलेंनी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे केलेली तक्रार 10. गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज 90 वा वाढदिवस, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव तर आज दिवसभर एबीपी माझावर सुरेल कार्यक्रमांची मेजवानी