मुंबई: अजित पवारांच्या नाट्यमय राजीनाम्यानंतर शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद मुळात सकाळी ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) कार्यालयात जाण्यावरून झालेल्या विषयावर असणार होती. मात्र, संध्याकाळी अजित पवारांच्या राजीनाम्याची बातमी आल्यानं सर्व माध्यमांचा बातमी आणि चर्चेचा विषयच बदलला. यामुळे शरद पवारांनाही अजित पवार राजीनामा प्रकरणावर सविस्तर खुलासे केले. या सर्वच प्रकरणातले मुख्य मुद्दे-


मुद्दा १-

"शिखर बँक घोटाळाप्रकरणी माझं (शरद पवार) नाव आल्यानं अजित पवार अस्वस्थ होते"- पवार

मुद्दा २-

"राजीनामा देण्यापूर्वी आणि दिल्यानंतरही त्यांनी माझ्याशी चर्चा केली नाही"- पवार

मुद्दा ३-

"आजचं राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. यातून बाहेर पडावं आणि शेती करावी, अशी चर्चा अजित पवारांनी कुटुंबियांसमवेत केली. मुलालाही राजकारणात न येण्याचा सल्ला दिला"- पवार

मुद्दा ४-

"अजित पवारांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण होऊ शकला नाही. मात्र, कुटुंबप्रमुख या नात्यानं मी यात लक्ष घालणार"- पवार

मुद्दा ५-

"पवारांमध्ये कुटुंबप्रमुखाचा शब्द अंतिम असतो. आमच्यात कोणतेही वाद नाहीत"- पवार

मुद्दा ६-

"तलवार हाती घेतल्यावर जिंकण्यासाठीच युद्ध करायचं. अजित युद्ध मध्येच सोडणार नाही"- पवार

मुद्दा ७-

"अजित पवारांच्या राजीनाम्याचा निवडणुकीवर परिणाम नाही"-पवार

मुद्दा ८-

अजित पवारांनी राजकीय संन्यास घेण्यावरून विचारलेल्या प्रश्नाला पवारांनी खोडून काढले.

मुद्दा ९-

पत्रकार परिषदेनंतर अजित पवारांची भेट घेण्यास पवार मुंबईला रवाना

मुद्दा १०-

रोहित पवार यांनीही पत्रकार परिषदेबाहेर पत्रकारांना कुटुंबात वाद नसल्याचं सांगितलं.  मात्र, पार्थ पवार यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी फक्त त्याला राजकारणातून बाहेर होण्यास सांगितलं, ते स्वत:बद्दल बोलले नाहीत, हे स्पष्ट केलं.