- जी 20 परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांची भेट, अमेरिकन उत्पादनावरील वाढीव आयात शुल्कासह अनेक मुद्द्यांवर चर्चा
- मुंबई उच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब, आरक्षण वैध असल्याचा निर्वाळा, शिक्षण क्षेत्रात 12 तर नोकऱ्यांत 13 टक्के आरक्षण
- मराठा आरक्षण कोर्टात टिकल्याने मराठा समाजामध्ये जल्लोष, 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळाल्याची मराठा समाजाची प्रतिक्रिया, ढोल-ताशे, पेढे भरवून सेलिब्रेशन
- मराठा आरक्षणानंतर मुस्लीम नेते आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक, मराठा समाज आमचा मोठा भाऊ असल्याने आमच्या मागे उभं राहावं, खासदार इम्तियाज जलिल यांचं आवाहन
- दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होणार, पर्यावरणमंत्री रामदास कदमांची विधानसभेत माहिती, प्लास्टिक बंदीसाठी मोठा निर्णय
- ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला, आज दिवेघाटाची अवघड चढण तर तुकोबांची पालखी लोणी काळभोरला मुक्कामी
- कल्याण, भिवंडी बदलापूरमध्ये जोरदार पाऊस, नाशकातही दमदार हजेरी, रामटेकमध्ये शाळेवर वीज पडल्यानं 8 विद्यार्थी जखमी
- स्वित्झर्लंडमध्ये नीरव मोदी आणि त्याच्या बहिणीशी संबधित चार बँक खाती गोठवली
- बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल, बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखल केली तक्रार
- मॅन्चेस्टरमध्ये टीम इंडियाकडून विंडीजचा 125 धावांनी धुव्वा, मोहम्मद शमीसह भारतीय आक्रमण प्रभावी, यंदाच्या विश्वचषकातला टीम इंडियाचा सलग पाचवा विजय