देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये


1. एल्गार परिषदेच्या तपासाची कागदपत्र देण्यास पुणे पोलिसांचा नकार, एनआयएची टीम रिकाम्या हाती तर सुधीर मुनगंटीवारांकडून राष्ट्रपती राजवटीचा धोका व्यक्त


2. पाच महिन्यांपासून धूळखात असलेल्या नागपूर मेट्रोचं आज उद्घाटन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती, लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रो आजपासून सेवेत


3. मुंबईतल्या नागपाड्यात सीएएविरोधात दुसऱ्या दिवशीही महिलांचं आंदोलन सुरु, विद्यार्थी नेता उमर खालिदची हजेरी तर बीड जिल्ह्यातील परळीतही महिलांचा ठिय्या


4. हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर, लातूरमधील कृषी नवनिर्माण 2020 चं उद्घाटन करुन दौऱ्याची सुरुवात


5. चंद्रपूरमधील दारुबंदीवर कोणताही पुनर्विचार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डॉ. अभय बंग यांना माहिती, दारुबंदी हटवण्याच्या बातम्या हा खोडसाळपणा असल्याचाही दावा


6. काँग्रेसची धुरा पुन्हा राहुल गांधींच्या खांद्यावर देण्यासाठी पक्षात हालचाली, तर उत्तर प्रदेश मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रियांका गांधींच्या नावाची चर्चा


7. दिल्लीतील निर्भयाच्या गुन्हेगारांची जीव वाचवण्यासाठी धडपड, राष्ट्रपतींनी दया याचिका घाईगडबडीने फेटाळल्याचा दावा करत दोषी मुकेश सुप्रीम कोर्टात, आज दुपारी सुनावणी


8.नवी मुंबई, ठाण्याहून एका तासात अलिबाग गाठता येणार, सहा महिन्यांत नेरुळमध्ये बोट टर्मिनस सुरु, फूड कोर्ट, प्रतिक्षा कक्ष, कार, बस पार्किंगची टर्मिनसवर सोय


9. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी; अत्यल्प, अल्प उत्पन्न गटातील 9 हजार 140 घरांचा समावेश


10. माघी गणेशोत्सवाचा राज्यभरात जल्लोष, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक सजावट; ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्येही सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल