देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

Continues below advertisement


1. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीची नोटीस, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश


2. येत्या दोन-तीन दिवसात सीरमच्या कोरोना लसीला मान्यता मिळण्याची शक्यता, तर आजपासून चार राज्यात लसीकरणाची रंगीत तालीम


3. साईबाबांच्या काकड आरतीसाठी 25 हजारांची मागणी केल्याचा महिला भक्ताचा आरोप, मंदिर प्रशासनाची भूमिका प्रतीक्षेत


4. काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या दिवशीच राहुल गांधी वैयक्तिक कारणासाठी इटलीला रवाना, राहुल गांधींच्या परदेश वारीची राजकीय वर्तुळात चर्चा


5. रत्नागिरीत डिझेल भरतानाच बसने पेट घेतला, पेट्रोल पंपावरील कर्मचारी गंभीर जखमी, वाहनचालकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना


6. खदाणीत बुडणाऱ्या आई आणि बहिणीला वाचवताना 16 वर्षीय मुलगी बुडली, डोंबिवली कोळेगावमधील हृदयद्रावक घटना, मुलीचा शोध सुरु


7. ऑनलाईन परीक्षेसाठी काहीकाळ मंगलाष्टके थांबली, पेपर सोडवूनच नवरी बोहल्यावर चढली, यवतमाळमधील लग्नाची चर्चा


8. 'गो कोरोना गो' नंतर रामदास आठवलेंचा आता नवा नारा, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आठवलेंचा 'नो कोरोना, कोरोना नो'चा नारा


9. थर्टी फर्स्टला गच्चीवर होणाऱ्या पार्टीवर मुंबई पोलीस ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवणार, सुरक्षेसाठी 35 हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरणार


10. बॉक्सिंग डे कसोटी भारताचा पहिला डाव 326 धावांवर आटोपवला, रहाणे आणि जडेजाच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियावर 131 धावांची आघाडी