1. राहुल गांधींच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकरचा आज काँग्रेस प्रवेश, गोपाळ शेट्टींविरोधात तिकीट मिळण्याची शक्यता तर अभिनेते शत्रुघ्न सिन्हाही उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार 


 

  1. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमधल्या बैठकीतही किरीट सोमय्यांच्या उमेदवारीचा फैसला नाही, शिवसेनेविरोधातली आगपाखड सोमय्यांना भोवण्याची शक्यता


 

  1. भाजपच्या बड्या नेत्याने ऑफर दिल्याचा सुशीलकुमार शिंदेंचा एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत दावा, मात्र भाजप नेत्याचं नाव सांगण्यास नकार


 



  1. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपमध्ये विलीन, दोन आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, गोव्यातील प्रमोद सावंत सरकारला दिलासा


 

  1. आघाडी करुनही कुत्र्या-मांजरासारखं भांडतात, गुजरातमधील सभेत पूनम महाजन यांचं विरोधकांवर टीकास्त्र, मनसेवरही जोरदार निशाणा


 

  1. गिरीश महाजनांनी घात केला, तिकीट कापल्यानंतर जळगावचे भाजप खासदार एटी पाटलांची जाहीर नाराजी


 

  1. कर्ज घोटाळ्याप्रकरणी उद्योजक आणि रासप नेते रत्नाकर गुट्टेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, शेतकऱ्यांच्या नावानं परस्पर 359 कोटींचं कर्ज लाटल्याचा ठपका


 

  1. खारघरमधील पाळणाघरात चिमुकलीला मारहाणप्रकरणी आरोपी आया अफसाना शेखला दहा वर्षांचा सश्रम कारावास, अलिबाग सत्र न्यायालयाचा निकाल


 

  1. चांद्यापासून बांद्यापर्यंत तापमानात वाढ, विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पारा चाळीशीपार, आरोग्याची काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन


 

  1. अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जची दिल्ली कॅपिटल्सवर सहा विकेट्सनी मात, अखेरच्या षटकांत चेन्नई विजयी