स्मार्ट बुलेटिन | 27 एप्रिल 2020 | सोमवार | एबीपी माझा

पंतप्रधान मोदी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार, लॉकडाऊनबाबत चर्चा होण्याची शक्यता

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होण्याची शक्यता, राज्यातील कोरोनाची परिस्थिती, आर्थिक आव्हानांवर चर्चा होणार

दिलासादायक... जगभरात मागील 24 तासात कोरोना संसर्ग, मृत्यूंच्या आकड्यामध्ये कमालीची घट



कोरोनाशी झुंजताना मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबांना 50 लाख अन् सरकारी नोकरी, गृहमंत्र्यांची माहिती

मुंबईतल्या सहा वॉर्डमध्ये 300 पेक्षा जास्त कोरोनाबाधित, मुंबईत कोरोना संक्रमितांची संख्या पाच हजाराहून जास्त

धारावीतील 350 खासगी दवाखाने सुरू होणार, बीएमसीच्या वतीने नवी योजना तयार

ऑफिसमध्ये जेवण पोहचवणाऱ्या मुंबईच्या डब्बेवाल्यांवर उपासमारीची वेळ; आर्थिक मदतीची मागणी

राज्याने कर्ज काढण्यापेक्षा केंद्राने कर्ज काढून राज्यांना मदत करावी, शरद पवार यांचं पंतप्रधानांना पत्राद्वारे आवाहन

वाधवान कुटुंबियांना पत्र दिल्याचं अमिताभ गुप्तांकडून कबूल, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहा; सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला