स्मार्ट बुलेटिन | 26 ऑक्टोबर 2020 | सोमवार | एबीपी माझा


बिहारमध्ये मोफत लस मग उर्वरित भारत काय बांग्लादेशात आहे का?, दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं विरोधकांना आव्हान


जळगावात खडसेंच्या सत्कार प्रसंगी राष्ट्रवादीचे अनेक नेते अनुपस्थित; राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय

एक दिवस शिवाजी पार्कवर मेळावा घेऊ, बीडमध्ये पंकजा मुंडेंना अश्रू अनावर, उसतोड कामगारांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा

पंकजा मुंडेंनी ऊसतोड कामगारांची अवस्था पाहावी आणि निर्णय घ्यावा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन

खासदार, आमदारांचे दोन वर्षांचे निधी घेतले त्याचं केंद्र, राज्याने काय केलं, खासदार उदयनराजेंचा सवाल

मुंबई मनपा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार, सत्ता शिवसेनेचीच!, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य

मुंबईतील वाडीबंदरमध्ये चोर असल्याच्या संशयातून एका व्यक्तीची हत्या, दोन आरोपींना अटक

शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतीशिवाय वेगळा बोनसही दिला, मन की बातमध्ये पंतप्रधानांकडून महाराष्ट्रातील कंपनीचं कौतुक

राजस्थानचा मुंबईवर 8 गडी राखून विजय; स्टोक्स-सॅमसन विजयाचे शिल्पकार