1. मुंबई मनपाच्या रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद, काळ्या यादीत टाकल्यानं औषध पुरवठादार संघटनेचा निर्णय, रुग्णांचे हाल होण्याची शक्यता


 

  1. मुंबईत बेस्ट बसचं किमान भाडं 8 वरुन 5 रुपयांवर, उत्पन्न वाढीसाठी प्रस्ताव मंजूर, तर पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही मॉल्समध्ये पार्किंग मोफत


 

  1. 'मातोश्री'जवळच्या नाल्याची सफाई न झाल्याने महापौरांची मुख्य अभियंत्यांसोबत शाब्दिक चकमक, आदेश देऊनही हा नाला साफ न झाल्यानं महापौर संतापले


 

  1. महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून पोहोचल्याची हवामान खात्याची वर्दी, मात्र प्रत्यक्षात राज्याचा अनेक भाग कोरडाच, तर महाराष्ट्राच्या चेरापुंजीतही पावसाची प्रतिक्षा


 

  1. ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी आज पुणे मुक्कामी, दुपारी संगमवाडी पुलावर दोन्ही पालख्यांचा संगम, तर भिडेंना माऊलींच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाही


 

  1. सप्टेंबरपासून राज्यात विधानसभेची आचारसंहिता, तर 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान निवडणूक, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचं भाकीत




  1. काँग्रेस पक्ष इतका उंच गेला आहे की त्यांना जमीन दिसत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र


 

  1. गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर, अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेचा आढावा घेणार, फुटीरतावाद्यांविरोधात कडक भूमिका


 

  1. फरार मेहुल चोकसीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, अँटिग्वा सरकारकडून चोकसीचं नागरिकत्व रद्द, लवकरच प्रत्यार्पण होण्याची शक्यता


 

  1. विश्वचषकाच्या रणांगणात आज पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी, पाकिस्तानसाठी करो या मरो तर सामना जिंकल्यास न्यूझीलंड उपांत्य फेरीत