- आजपासून राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन अधिवेशन तापणार, सरसकट कर्जमाफीची विरोधकांची मागणी
2. दुष्काळ पक्षाचा नसून राज्याचा आहे, विरोधकांच्या सूचनांवर सकारात्मक प्रतिसाद देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन
3. घर खरेदीदारांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, निर्माणाधीन घरांवरचा जीएसटी 12 वरुन 5 टक्क्यांवर, सवलतीतील घरांना फक्त 1 टक्के जीएसटी
4. नांदेडमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा बोजवारा, 1 हजार 21 लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे परत करण्याचे बँकेचे निर्देश
5. राज्यातील काश्मीरी विद्यार्थ्यांना संपूर्ण संरक्षण, हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन
6. शरद पवार आपल्यासाठी पितृतुल्य, नातवासाठी लोकसभेची जागा सोडावी, नगरच्या जागेसाठी राधाकृष्ण विखे पाटलांची पवारांना भावनिक साद
7. काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, चकमकीत पोलिस उपअधीक्षकासह एक जवान शहीद
8. बुलडाण्यात दहावीच्या परीक्षेच्या तणावातून दोन विद्यार्थिंनीची आत्महत्या, एकीची प्रकृती गंभीर
9. 91 व्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात, रोमा आणि द फेव्हरिटमध्ये चुरस, सोहळ्याकडं जगाचं लक्ष
10. विशाखापट्टणमच्या टी-२० सामन्यात कांगारुंची टीम इंडियावर तीन विकेट्सनी मात, अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलिया विजयी