देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. एक ऑक्टोबरपासून मुंबईमध्ये प्रवेशासाठी जादा टोल मोजावा लागणार, पाचही नाक्यांवर 5 ते 25 रूपयांची टोलवाढ, मासिक पासही महागला
2. संसदेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात 250 शेतकरी संघटनांकडून आज भारत बंदची हाक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी संघटानाही आंदोलनात सहभागी होणार
3. आरक्षणाच्या मागणीसाठी आज धनगर समाजाचा राज्यभर एल्गार, गोपीचंद पडळकर पंढपुरातील विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन करणार
4. मराठवाड्यात पावसामुळे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान, शेकडो गावांतील हजारो शेतकऱ्यांना फटका, डोळ्यांदेखत उद्ध्वस्त शेती पाहून अश्रू अनावर
5. चंद्रपूर, अकोल्यात आजपासून पाच दिवसांसाठी जनता कर्फ्यू, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद, अकोल्यात मात्र जनता कर्फ्यूला भाजप, वंचित बहुजन आघाडीचा विरोध
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 25 सप्टेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha
6. राज्यात काल 9 हजार 164 नवे कोरोना बाधित, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लागण, तर दिवसभरात 17 हजार 184 रुग्ण कोरोनामुक्त
7. जगभरातील 213 देशांमध्ये 3 कोटी 23 लाख लोकांना कोरोनाची लागण, 9 लाख 87 हजार रुग्णांचा मृत्यू, तर 2 कोटी 39 लाख रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त
8. ड्रग्स प्रकरणी समन्स बजावल्यानंतर दीपिका, सारा, रकुल प्रीत मुंबईत परतल्या, आज रकुलची तर उद्या दीपिका, सारा आणि श्रद्धाची चौकशी
9. शाहरूख खानच्या पार्ट्यांमध्ये ड्रग्सचा बाजार, अभिनेत्री शर्लिन चोप्राचा गौप्यस्फोट, तर करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनसाठी काम करणाऱ्या दिग्दर्शकालाही समन्स
10. आयपीएलच्या मैदानात काल कर्णधार लोकेश राहुलच्या शतकी खेळीनं पंजाबचा बंगलोरवरती दणदणीत विजय, तर आज धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सची दिल्ली कॅपिटल्सशी लढत