#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. शिवसेना-भाजप युतीची आज घोषणा होण्याची शक्यता, जागावाटपाबाबत रात्री वर्षा बंगल्यावर 4 तास खलबतं, भाजप आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार
2. युतीबाबत आणखी एक नवा फॉर्म्युला, भाजपचा 115 जागांचा प्रस्ताव तर शिवसेना 125 जागांवर ठाम, 10 जागांवर घोडं अडल्याची सूत्रांची माहिती 3. माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, ह्यूस्टनमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचं कौतुक करणारं ट्वीट, मोदींकडूनही प्रतिसाद 4. निवडणुकांच्या वेळीच 'बालाकोट' कसं आठवतं?, राष्ट्रवादीच्या माजिद मेमन यांचा लष्करप्रमुखांना सवाल 5. आधार, पॅन, पासपोर्ट, मतदान ओळखपत्राऐवजी एकच ओळखपत्र आणण्याचा केंद्राचा विचार, अमित शाह यांची माहिती, पुढची जनगणनाही मोबाईल अॅपवर होणार