1. नरेंद्र मोदींच्या हस्ते 'पंतप्रधान किसान सन्मान निधी'चं आज उद्घाटन, एक कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा होणार


 

  1. अर्थमंत्री अरुण जेटलींच्या नेतृत्त्वाज जीएसटी काऊन्सिलची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, निर्माणाधीन आणि स्वस्त घरांवरील जीएसटीबाबत चर्चा होणार


 

  1. मसूद अजहर मौलाना नसून सैतान, पुलवामा हल्ल्यावरुन असदुद्दीन ओवेसींचा पाकिस्तानवर घणाघात, मुंबईत वंचित बहुजन आघाडीची विराट सभा


 

  1. राष्ट्रवादी काँग्रेसला संपवणं म्हणजे चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला, परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा समारोप


 

  1. गुलाम म्हणून शिवसेना-भाजपसोबत राहणार नाही, युतीत रिपाइंला एकही जागा न मिळाल्याने रामदास आठवले नाराज, राजकारणात सर्व मार्ग खुले असल्याचेही संकेत


 

  1. औरंगाबादच्या आरोग्य मेळाव्यात चंद्रकांत खैरेंची अंधश्रद्धा, जप करुन रुग्णांना बरं करतो, मात्र प्रमोद महाजनांच्याबाबतीत मी फेल झालो, चंद्रकात खैरेंचा अजब दावा


 

  1. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पुन्हा रुग्णालयात, 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार, तर पर्रिकरांची प्रकृती स्थिर असल्याची गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती


 

  1. अपघातानंतर मृतदेह 22 किलोमीटर फरफटत नेला, लातूरमधील धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर, गाडी ताब्यात मात्र चालक फरार


 

  1. एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्याच्या धमकीनंतर मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवली, पोलिसांकडून कसून चौकशी, एक संशयित ताब्यात


 

  1. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान आज विशाखापट्टणममध्ये पहिला टी-20 सामना, पाच वन डे आणि दोन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात